प्रियांका नेगीच्या सेलेब्रिटीपदावर मोहर

Seal on Priyanka Negi's celebrity status

भारताची तसेच हिमाचल प्रदेशची आघाडीची कबड्डीपटू प्रियांका नेगी ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. यातही विशेषतः इन्स्टाग्रामवर ती जास्त सक्रिय दिसते. गेल्या काही वर्षांत कबड्डीपटू हे सेलिब्रिटी बनत असल्याचे पहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून कबड्डीपटूंची सोशल मीडिया अकाउंट व्हेरिफाय होताना दिसतात. यात आता प्रियांका नेगीची भर पडली आहे. प्रियांका नेगीचे इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय झाले असून तिच्या नावासमोर आता निळ्या रंगाची टिक दिसत आहे.

प्रियांकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. स्टोरीमध्ये तिने “फायनली” असे लिहिले आहे. प्रियांकाचे इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय झाल्याबद्दल चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय होणारी प्रियांका ही भारताची बहुधा पहिलीच महिला कबड्डीपटू आहे.

प्रियांका ही २०१२ च्या विश्वचषकविजेत्या भारतीय संघाची सदस्य होती. हिमाचल प्रदेशकडून तिने ६५ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक देखील मिळवले होते.