कबड्डी खेळाडूंनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 

Kabaddi players celebrate and wish everyone on Rakshabandhan

आज रक्षाबंधन.बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. सबंध भारतात हा सण साजरा केला जातो.
भारतातील आघाडीच्या कबड्डी खेळाडूंनी आज रक्षाबंधनाचे निमित्त साधून शुभेच्छा दिल्या. अनेक खेळाडूंनी आपल्या बहिणीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या रक्षाबंधनाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्ये अनुप कुमार, अजय ठाकूर, नितीन तोमर, राहुल चौधरी, नितेश कुमार, बलदेव सिंग, संदीप नरवाल, मनजीत दहिया यांच्याबरोबर महिला कबड्डी खेळाडू अभिलाषा म्हात्रे, प्रियांका नेगी यांचा समावेश आहे. प्रो कबड्डीमधील पुणेरी पलटण, जयपूर पिंक पँथर्स, हरयाणा स्टीलर्स, पटना पायरेट्स या संघानीदेखील आपल्या चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

https://www.instagram.com/p/CDa5d7qgQKU/?igshid=wwth6e18ysc7