क्रिकेटमध्ये गोलंदाज तर कबड्डीत कॉर्नर..काय आहे मनप्रीतचा फंडा?
Bowlers in cricket and corners in kabaddi..what is Manpreet’s funda?

भारतासारख्या देशात गेली अनेक वर्षे क्रिकेट सोडून बाकी कोणताच खेळ फारसा प्रसिद्ध नव्हता. प्रो कबड्डी लीगच्या आगमनानंतर मात्र परिस्थिती बदलू लागली आहे. बरेच तरुण खेळाडू, शाळकरी मुले आता कबड्डीकडे एक पर्याय म्हणून पाहू लागली आहेत. क्रिकेट आणि कबड्डीमध्ये साम्य आहे असे कुणी एरवी सांगितले असते तर त्याला तुम्ही वेड्यात काढले असते. मात्र आता गुजरात फॉर्च्युन जायंट्सचा प्रशिक्षक खुद्द मनप्रीत सिंग यानेच क्रिकेट आणि कबड्डी मधले समान दुवे मांडले आहेत. मनप्रीत प्रो कबड्डी लीगने आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.
यावेळी बोलताना मनप्रीत म्हणाला,
“भारतात गोलंदाजी करून कुणीही खुश नाहीये. कुठल्याही अकादमीमध्ये गेलात तर तुम्हाला फक्त फलंदाज दिसतील. त्या सगळ्यांना फलंदाजीच करायची असते. कबड्डीचे सुद्धा असेच आहे. तुम्ही कबड्डी अकादमीमध्ये गेलात तर तुम्हाला सगळे रेडर सापडतील. कुणी उजव्या बाजूने तर कुणी डाव्या बाजूने रेड करतो. कुणाला डिफेन्स करायची इच्छाच नसते. मात्र खेळात जिंकायचे असेल तर संघच समतोल राखणे गरजेचे असते.”
Related Posts
जसे क्रिकेटमध्ये गोलंदाज, फलंदाज आणि अष्टपैलू असतात तसेच कबड्डीच्या संघातही असतात. यावर सविस्तर बोलताना मनप्रीत म्हणाला,
“कबड्डीत लेफ्ट आणि राईट कॉर्नर असतात. ते म्हणजे वेगवान गोलंदाज. लेफ्ट आणि राईट कव्हर म्हणजे संघाचे फिरकी गोलंदाज आहेत. जे रेडर आहेत ते फलंदाज तर जो मध्ये एक रेडर असतो तो म्हणजे संघाचा अष्टपैलू खेळाडू. असा कबड्डी संघ बनतो. क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजच खेळले तर तुम्ही जिंकू शकत नाही. तसेच कबड्डीचे आहे. तुम्हाला सामने जिंकायचे असतील तर संघाचा समतोल असलाच पाहिजे.”
मनप्रीत पटना पायरेट्सकडून प्रो कबड्डीचा एक हंगाम खेळला. या हंगामात त्याने पटनाला विजेतेपद मिळवून दिले होते.