अशी आहे मनप्रीतची ड्रीम ७ टीम

This is Manpreet’s Dream 7 team

–  नचिकेत धारणकर

लॉकडाऊनमध्ये प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून आपल्या चाहत्यांशी संवाद साधतांना दिसतात.प्रो कबड्डी लीगकडूनही बियाँड ड मॅट नावाचा कार्यक्रम त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आयोजित केला जातो.

या कार्यक्रमात आपल्या आवडत्या खेळाडूला चाहते अनेक प्रश्न विचारतात. त्यामध्ये तुमची ड्रीम टीम कोणती हा कदाचित सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न असेल. खेळाडूसुद्धा त्याचे उत्तर तेवढ्याच उत्साहाने देतात.

या आठवड्यात या कार्यक्रमात आलेल्या मनप्रीतनेसुद्धा आपली ड्रीम टीम सांगितली. गुजरात फॉर्च्युन जायंटचा प्रशिक्षक तसेच पटणा पायरेट्स तर्फे १ हंगाम खेळलेल्या मनप्रीतने आपल्या ड्रीम टीम मध्ये ३ गुजरात तर २ पटणाच्या खेळाडूंना स्थान दिले आहे.

मनप्रीत ड्रीम टीम

१. रोहित गुलिया – सेंटर

२. सुनील कुमार – राईट कव्हर

३. परवेश भैन्सवाल – लेफ्ट कव्हर

४. नविन कुमार – रेडर

५. परदीप नरवाल – रेडर

६. संदीप नरवाल – राईट कॉर्नर

७. सुरेंदर नाडा – लेफ्ट कॉर्नर

मनप्रीतने तिसऱ्या हंगामात पटणाला विजेतेपद मिळवून दिले होते.