धक्कादायक – भारतीय कबड्डी महासंघाची मान्यता रद्द

Shocking - Recognition of Amateur Kabaddi Federation of India cancelled

भारतीय कबड्डी प्रेमींसाठी धक्कादायक बातमी आहे. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने भारतीय कबड्डी महासंघाची (AKFI) मान्यता रद्द केली आहे

भारतातील एकूण ५४ राष्ट्रीय क्रीडा महासंघाची मान्यता रद्द करणारे पत्र क्रीडा मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले.यामध्ये भारतीय कबड्डी महासंघाबरोबरच ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, ऑल इंडिया टेनिस असोसिएशन, खो खो फेडरेशन ऑफ इंडिया यांसारख्या संस्थांचा समावेश आहे.

या संस्थांच्या कारभारातील पारदर्शकतेच्या अभावामुळे त्यांची मान्यता रद्द केली असल्याची शक्यता आहे.या ५४ संस्थांना दरवर्षी मान्यतेचे पत्र क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येते.असेच तात्पुरते पत्र २ जून २०२० रोजी या संस्थांना देण्यात आले होते.
मात्र आता याबाबत दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार हे पत्र रद्द आहे असे समजण्यात यावे अशा आशयाचे सुधारित पत्र क्रीडा मंत्रालयाने पाठवले आहे.

यामुळे आता भारतातील कबड्डी स्पर्धांचे भविष्य सध्यातरी टांगणीवर आहे असे दिसते.