प्रो कबड्डी श्रीलंकेत होण्याचे वृत्त चुकिचे, यांनी दिले स्पष्टीकरण
Pro Kabaddi in Sri Lanka not happening, authorities issue clarification

आज दिवसभरात प्रो कबड्डी लीगचा यावर्षीचा हंगाम श्रीलंकेत होणार असल्याच्या बातमीने कबड्डी क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.आता याबाबत मशाल स्पोर्ट्स आणि श्रीलंका कबड्डीचे अध्यक्ष अनुरा पाथीराना या दोनही पक्षांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पाथीराणा यांनी सांगितले की प्रो कबड्डी लीग श्रीलंकेत घेण्याबद्दल लीगच्या व्यवस्थापनासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही.याबाबत पाथीराणा यांच्या नावाने प्रसिद्ध झालेले कोणतेही वक्तव्य साफ चुकीचे आहे.
याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना मशाल स्पोर्ट्सचे प्रवक्ते म्हणाले,
“प्रो कबड्डी सहसा जुलै ते ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाते.यावर्षी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आम्ही अजूनही अंदाज घेत आहोत. यातून कबड्डी क्षेत्र, चाहते, खेळाडू आणि इतर महत्वाच्या घटकांना सुरक्षितरीत्या लीगचा आनंद कसा घेता येईल याची आम्ही चाचपणी करत आहोत.प्रो कबड्डी लीगमधील खेळाडू आणि इतर घटकांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाची आहे.सध्या आम्ही याबाबत श्रीलंका कबड्डी फेडरेशन बरोबर कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही.जो काही निर्णय असेल तो सर्व व्यवस्थापन, भारतीय कबड्डी महासंघ आणि प्रो कबड्डी लीगमधील संघ यांच्या बरोबर चर्चा करूनच घेण्यात येईल.”
मशाल स्पोर्ट्सच्या स्पष्टीकरणामुळे प्रो कबड्डी लीग श्रीलंकेत होणार असल्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे.