कबड्डीपटूंनी दिल्या फादर्स डे च्या शुभेच्छा
Kabaddi Players celebrate Father's Day
दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. अमेरिकेत १९१० साली सर्वप्रथम फादर्स डे साजरा केला गेला. त्यानंतर ही प्रथा सुरू झाली. आपल्या आयुष्यात वडिलांच्या भूमिकेचा सन्मान करायचा म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
कबड्डी क्षेत्रातूनही फादर्स डे साजरा करण्यात आला. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, पंच यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये अजय ठाकूर, नितीन तोमर, नवीन कुमार गोयत,मोनू गोयत,श्रीकांत जाधव, प्रियांका नेगी, दर्शन काडीयान, नीतेश कुमार,सुरजित सिंग तसेच पंच आरती बारी यांचा समावेश आहे. प्रो कबड्डी लिगमधील संघ पुणेरी पलटण, जयपूर पिंकपँथर्स, हरयाणा स्टीलर्स, बंगाल वॉरियर्स यांनी देखील फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.