ही आहे मनिंदर सिंगची ड्रीम टीम

Here's a look at Maninder Singh's dream team

कबड्डी खेळाडू आणि त्यांची ड्रीम ७ टीम हा सध्या चर्चेचा विषय आहे. लॉकडाऊनमध्ये विविध कबड्डी खेळाडू आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी बऱ्याचदा चाहते खेळाडूंना त्यांची ड्रीम ७ टीम सांगण्याची विनंती करतात.

प्रो कबड्डी लीगद्वारा आयोजित ‘बियाँड द मॅट’या कार्यक्रमात आजवर काही कबड्डी खेळाडू येऊन गेले. या सर्व कबड्डी खेळाडूंना चाहत्यांनी त्यांची ड्रीम ७ टीम सांगण्याची विनंती केली. आजही बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंग याला त्याची ड्रीम टीम सांगण्याची विनंती करण्यात आली. आपली ड्रीम टीम सांगताना मनिंदर काहीसा गोंधळून गेला आणि सात ऐवजी आठ खेळाडूंची नावे घेतली.

 

मनिंदर ड्रीम टीम

१. रण सिंग – राईट कॉर्नर

२.सुरजित – राईट कव्हर

३.बलदेव सिंग किंवा रविंदर पहल – लेफ्ट कॉर्नर

४. महेंदर सिंग – लेफ्ट कव्हर

५. परदीप नरवाल – रेडर

६. अजय ठाकूर – रेडर – कर्णधार

७. नवीन कुमार – रेडर

८.मनिंदर सिंग – रेडर

 

मनिंदरने प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात जयपूर कडून तर सातव्या हंगामात बंगालकडून खेळताना विजेतेपद मिळवले आहे.