जेव्हा एक कुस्तीपटू बनतो कबड्डीपटूचा आदर्श
When a wrestler becomes a Kabaddi player's idol

प्रत्येक खेळाडूचा कुणीतरी आदर्श, रोल मॉडेल असतोच. ह्या रोल मॉडेलकडून प्रेरणा घेत हे खेळाडू आपली कारकीर्द घडवतात. अनेकदा ह्या रोल मॉडेल्सच्या केवळ एका सल्ल्याने खेळाडूंची कारकीर्द बहरते. प्रत्येक खेळाडूला आपल्या रोल मॉडेलबद्दल एक वेगळा आदर असतो.
भारतीय कबड्डीत गेल्या काही वर्षांत अनेक नवे चेहरे पुढे आलेले दिसले. नवीन कुमार, नितेश कुमार, पवन सेहरावत ही त्यातलीच काही नावे. कबड्डी खेळाडूंच्या रोल मॉडेलची चर्चा होते तेव्हा अनेक खेळाडू दुसऱ्या कुठल्यातरी कबड्डीपटूचेच नाव घेतात. बंगळुरू बुल्सचा तुफानी रेडर पवन सिंग सेहरावत याची गोष्ट मात्र निराळीच आहे. नुकताच पवनला त्याच्या रोल मॉडेल कोण आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
Related Posts
या प्रश्नाचे उत्तर देताना पवनने चक्क एका कुस्तीपटूचे नाव घेतले. होय, पवनने आपला आदर्श म्हणून भारताचा आघाडीचा कुस्तीपटू सुशील कुमार याचे नाव घेतले. कबड्डी क्षेत्र सोडून सुशील कुमार आपला रोल मॉडेल आहे असे पवन म्हणाला. सुशील कुमार हा भारताचा आघाडीचा कुस्तीपटू असून त्याने आजतागायत ऑलिंपिकमध्ये एक ब्रॉन्झ आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. कुस्तीतील त्याच्या योगदानासाठी भारत सरकारने त्याचा अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे.
कबड्डीमधील रोल मॉडेल म्हणून पवनने मनजित चिल्लरचे नाव घेतले. मनजित एक चांगला कर्णधार आणि ऐक चांगला खेळाडू आहे असे पवन म्हणाला. पवनने प्रो कबड्डीच्या दोन हंगामांत आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो सहाव्या हंगामात मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरसुद्धा ठरला होता तर सातव्या हंगामात त्याने ३६० गुण मिळवले होते.