राईट कॉर्नर ते एक खतरनाक रेडर – कसा होता पवनचा प्रवास?
A Right Corner To A Deadly Raider – How Was The Pawan’s Journey?

प्रो कबड्डीच्या गेल्या दोन हंगामांमध्ये मध्ये आपल्या तूफान खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणून पवनकुमार सेहरावतचे नाव घेतले जाते. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामापासून खेळत असलेल्या पवनने सहाव्या आणि सातव्या हंगामात जोरदार कामगिरी केली होती. आपल्या रेडींग कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारा पवन सुरुवातीला मात्र रेडर नव्हता. स्वतः पवनने याबद्दल खुलासा केला. तो प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.
यावेळीबोलताना पवन म्हणाला,
“रेडर म्हणून खेळायला सुरुवात करण्याआधी मी एक राईट कव्हर, राईट कॉर्नर म्हणून खेळलो आहे. भारतीय रेल्वेच्या संघात जेव्हा माझा समावेश झाला तेव्हा मी एक रेडर म्हणून नाही तर राईट कव्हर आणि राईट कॉर्नर म्हणून भरती झालो होतो. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामात जेव्हा मला संधी मिळाली तेव्हाही एक राईट कॉर्नर म्हणूनच ती संधी मिळाली होती. त्यांनतर मी रेडर म्हणून खेळायला सुरुवात केली.
Related Posts
सुरुवातीला मी प्रामुख्याने राईट कॉर्नर म्हणूनच खेळत असे. गरज पडेल तेव्हा काही वेळेस रेड करत असे. नंतर संघाला जेव्हा गरज पडू लागली तसा एक रेडर म्हणून मी खेळू लागलो.माझ्या प्रशिक्षकांनी तेव्हा मला सांगितले की, “तू राईट कॉर्नर तर खेळतोच आहेस. रेडसुद्धा करत जा. ज्या दिवशी रेडमधून गुण मिळणे बंद होईल त्या दिवशी रेड करू नकोस.”
मी खेळत राहिलो आणि आता प्रामुख्याने रेडर म्हणूनच खेळतो आहे. आपल्या रेड्सच्या जोरावर पवनने प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात तब्ब्ल ३६० गुण नोंदवले. सहाव्या हंगामातही त्याने २८२ गुण मिळवत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.