हे संघ बनू शकतात पाच हजारांचे मानकरी
These teams can become the five thousand club members

आजपर्यंत प्रो कबड्डी लीगचे सात हंगाम पार पडले आहेत. या सात हंगामाच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास केवळ चार संघांनी ४००० गुणांचा टप्पा गाठला आहे. प्रो कबड्डीच्या येणाऱ्या हंगामात कोणता संघ ५००० गुणांचा टप्पा आधी गाठणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. सध्याच्या परिस्थितीवरून खालील चार संघाना हा मान सर्वप्रथम मिळवण्याची संधी आहे.
१. पटना पायरेट्स – प्रो कबड्डी लीगमधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून पटना पायरेट्स हा संघ ओळखला जातो. या संघाने प्रो कबड्डीची सलग तीन विजेतीपदे मिळवली आहेत. या तीन विजेतेपदांबरोबरच पटना पायरेट्सच्या नावावर आणखीही काही विक्रम आहेत. प्रो कबड्डी लीगमधील सर्वाधिक ४६५७ गुण नोंदविणारा संघाचा मान या संघाकडे आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये ५००० गुणांचा टप्पा गाठणारा पहिला संघ बनण्यासाठी पटनाला फक्त ३४३ गुणांची आवश्यकता आहे. पटना पायरेट्सची गेल्या काही हंगामातील कामगिरी पाहता हा मान मिळवणारा पहिला संघ ठरण्याची त्यांना नामी संधी आहे.
Related Posts
२. यू मुंबा – प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामापासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून यू मुंबाचे नाव घेतले पाहिजे. ह्या संघाने आजपर्यंत चार वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केला असून प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाचे विजेतेपदही मिळवले आहे. आत्तापर्यंत यू मुंबाने ४२८८ गुण मिळवले असून ५००० गुणांचा टप्पा गाठण्यासाठी त्यांना ७१२ गुणांची आवश्यकता आहे. गेल्या सलग तीन हंगामांत या संघाने ७०० हून अधिक गुण मिळवले आहेत. यू मुंबाची कामगिरी चांगली असली तरी हा मान मिळवणारा पहिला संघ ते बनतील याबद्दल साशंकता आहे. पटना पायरेट्सकडून अतिशय सुमार कामगिरी झाली तरी यू मुंबाला हा मान त्यांच्याआधी मिळवणे सध्यातरी अवघड दिसते.
३. बंगळुरू बुल्स – बंगळुरू बुल्स संघाने गेल्या काही हंगामात चांगली कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी सहाव्या हंगामाचे विजेतेपदही मिळवले होते. आत्तापर्यंत या संघाने ४१७२ गुण मिळवले असून ५००० गुणांचा टप्पा गाठण्यासाठी त्यांना ८२८ गुणांची आवश्यकता आहे. सहाव्या आणि सातव्या हंगामात या संघाने अनुक्रमे ८८७ आणि ८६८ गुण मिळवले होते. संघाच्या कामगिरीचा आलेख आहे तसाच राहिल्यास हा संघ ५००० गुणांचा टप्पा गाठू शकतो.