हे ज्या संघाला जमलं त्याने प्रो कबड्डीची फायनल जिंकली 

The team that managed this won the PKL title

आजतागायत प्रो कबड्डी लीगचे सात हंगाम पार पडले आहेत. पहिल्या हंगामापासून या लीगने लोकप्रियतेचे अनेकानेक विक्रम केले आहेत. प्रो कबड्डी लीगची तीन विजेतीपदे मिळवत पटना पायरेट्स संघाने या लीगवर आपले वर्चस्व ठेवले आहे. पटना पायर्ट्सबरोबर यु मुंबा, जयपूर पिंक पँथर्स, बंगाल वॉरियर्स, बंगळुरू बुल्स या संघांनी प्रत्येकी एकदा लीगचे विजेतेपद मिळवले आहे.
प्रो कबड्डीच्या लीगच्या अंतिम फेरीच्या सामन्यांकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते. अंतिम फेरीच्या सामन्यात मध्यांतराला  जो संघ आघाडीवर असतो तोच पुढे जाऊन अंतिम सामना जिंकतो. प्रो कबड्डीच्या आजपर्यंतच्या सातपैकी पाच अंतिम फेरीच्या सामन्यांत मध्यांतराला  आघाडीवर असलेला संघ विजेता ठरला आहे. याला अपवाद फक्त सहाव्या आणि सातव्या हंगामाचा आहे. सहाव्या हंगामाच्या अंतिम फेरीत मध्यांतराला गुजरात फॉर्च्युन जायंट्स संघ १६-९ असा आघाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात बंगळुरू बुल्सने जोरदार मुसंडी मारत गुजरातवर ३८-३३ असा विजय मिळवला. सातव्या हंगामाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात दोनही संघ मध्यांतराला १७-१७ असे बरोबरीत होते. अखेरीस बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्ली संघावर ३९-३४ असा विजय मिळवला. अंतिम फेरीच्या इतर पाचही अंतिम फेरीच्या सामन्यांत पहिल्या डावात आघाडीवर असलेला संघ विजयी ठरला.
यंदा होणार प्रो कबड्डीचा आठवा हंगाम करोनामुळे लांबणीवर पडला आहे. नोव्हेंबर महिन्यांत प्रो कबड्डी लीग पार पडणार असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले असले तरी याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.