या आकडेवारीवरून कळते की नवीनही शेवटी माणूसच आहे…

These numbers prove that Naveen is a human being after all

प्रो कबड्डी लीगमधील संघ दबंग दिल्लीचा स्टार खेळाडू नवीन कुमारने आपल्या तुफान खेळाने चाहत्यांची मने जिंकली. प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामात नवीनने २२ सुपर १० नोंदवत विक्रम नोंदवला होता. या हंगामात त्याने मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा किताबदेखील जिंकला.
प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात दबंग दिल्लीच्या संघाला नवीनने आपल्या एकहाती खेळाच्या जोरावर अंतिम फेरीत पोहोचविले होते. हे करताना नवीनने सलग २१ सुपर १० करण्याचा विक्रमसुद्धा केला. प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात नवीन २३ सामने खेळला. यापैकी २२ सामन्यांत त्याने सुपर १० नोंदवला. मात्र नवीन जेव्हाजेव्हा सुपर १० करतो त्या प्रत्येक वेळी दबंग दिल्लीचा संघ विजयी होतोच असे नाहीये. नवीनने सुपर १० केलेल्या २२ पैकी ४ सामन्यांत दिल्लीला पराभव स्वीकारावा लागला होता. यामध्ये बंगाल वॉरियर्सविरुद्धचा अंतिम सामनादेखील समाविष्ट आहे. तसेच ३ सामन्यांत दिल्लीला बरोबरी स्वीकारावी लागली तर उरलेल्या १५ सामन्यांत दिल्लीला विजय मिळवला.
वरील आकडेवारीवरून एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे नवीनने सुपर १० केला तरी त्याच्या संघाला तो विजय मिळवून देतोच असे नाही. प्रो कबड्डीच्या आगामी आठव्या हंगामात नवीन कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.