प्रदीप म्हणतो हा डिफेंडर सगळ्यात खतरनाक

Pardeep says this defender is the most dangerous

परदीप नरवालला कबड्डीमधील रेकॉर्ड ब्रेकर या नावाने ओळखले जाते. प्रो कबड्डीत एका रेडमध्ये आठ पॉईंट्स मिळविण्याचा पराक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे. मात्र या विक्रमविरालासुद्धा एका खेळाडूसमोर रेड मारणे अवघड वाटते. स्वतः परदीपनेच याबाबद्दल माहिती दिली.तो प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.

यावेळी परदीपला रॅपिड फायरमध्ये प्रो कबड्डीमधील सर्वात अवघड असा डिफेंडर कोण आहे?असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना परदीपने मनजीत चिल्लरचे नाव घेतले. मनजीत हा कबड्डीतील एक जुना आणि अनुभवी खेळाडू आहे.त्याने आपल्या खेळाच्या जोरावर अनेकदा संघाला विजयी केले आहे. मनजीतने प्रोकबड्डीत आजपर्यंत सर्वाधिक ३३९ टॅकल पॉईंट्स मिळवले आहेत. प्रो कबड्डीत ५०० हुन अधिक पॉईंट्स मिळवणारा तो केवळ दुसरा अष्टपैलू खेळाडू आहे.

यावेळी परदीपने प्रो कबड्डीत आपला आवडता रेडर मोनू गोयत असल्याचेही सांगितले.मोनू आणि परदीपच्या जोडीने पटणा पायरेट्सकडून खेळताना धुमाकूळ घातला होता.