म्हणून रिशांक बनला कबड्डीपटू…

How did Rishank end up becoming a Kabaddi player?

भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू रिशांक देवडीगाने आपण कबड्डीपटू कसे झालो याचे कारण उलगडले.रिशांक प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियाँड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.
यावेळी बोलताना रिशांक म्हणाला,
“प्रो कबड्डीत येण्याआधी मी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असे.दुसरीकडे मी माझी कबड्डीची आवडही जोपासत होतो. ठाणे महापौर स्पर्धेत खेळण्यासाठी मी माझ्या मॅनेजरकडे पाच दिवसांची सुट्टी मागितली.त्यानेही मोठ्या मनाने मला सुट्टी दिली.ह्या स्पर्धेनंतर देना बँकेच्या संघाने मला त्यांच्याकडून खेळण्यासाठी संधी दिली.त्या स्पर्धेत खेळण्यासाठी पुन्हा मला एक आठवडा सुट्टीची गरज लागणार होती. मी पुन्हा एकदा माझ्या मॅनेजरकडे सुट्टी मागायला गेलो.यावेळी मात्र त्याने मला नकार दिला.तू एकतर कबड्डी खेळ किंवा हॉटेलमध्ये काम कर असे त्याने मला सांगितले.तो प्रसंग माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.मी कबड्डीची निवड करत नोकरी सोडून दिली आणि पूर्णवेळ कबड्डीवर लक्ष केंद्रित केले.”
त्यानंतर लवकरच रिशांकची प्रो कबड्डी लीगमध्ये निवड झाली आणि त्याचा पुढचा प्रवास सर्वज्ञात आहे.