राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे एन.टी.पी.एस. नंदुरबार संघाला विजेतेपद

परभणी (मानवत) येथे झालेल्या “छञपती चषक” निमंञीत राज्यस्तरीय पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे पुरूष गटाचे अजिंक्यपद एन.टी.पी.एस.नंदुरबार संघाने पटकावले. तर महिला गटात शिवओम क्रीडा मंडळ पुणे अजिंक्यपद पटकावले.

एन.टी.पी.एस. नंदुरबार संघाची गरूड झेप …

राष्ट्रीय खेळाडू दादा आवाड यांच्या नेतृत्वाखाली एन.टी.पी.एस. नंदुरबार ह्या संघाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. एक वेळा द्वितीय स्थानावर तर दोन वेळा स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पैठण येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व मानवत येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा नंदुरबार संघाने अजिंक्यपदाचा मान प्राप्त केला. तर पुणे महापौर स्पर्धेत द्वितीय स्थानावर राहिला होता.

बंजरंग परदेशी च्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा कबड्डी मध्ये गरूड झेप घेत आहे. संघाला प्रोत्साहीत करण्यासाठी संघाचे प्रशिक्षक बंजरंग परदेशी, धुमाळ सर, प्रथमेश पाटील (पप्पु दादा) यांचे मनापासून प्रयत्न चालु आहेत. संघाची तुफानी कामगीरी बघुन नंदुरबार जिल्ह्याचे कबड्डी कार्यवाह श्री साळुंके साहेब खुश आहेत.

नंदुरबार जिल्ह्याला कबड्डीमध्ये कमी लेखुन चालनार नाही तर त्यांच्या मेहनतीला दाद द्यावीच लागणार आहे.

परभणी जिल्ह्याचे कबड्डी स्पर्धेवर वर्चस्व…

मराठवाड्यातील परभणी जिल्हा कबड्डीची पंढरी म्हणून नावरूपाला येत आहे. परभणी जिल्हा संघटनेचे सचिव तथा राज्य कबड्डी संघटनेचे कोषाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंगल पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा कबड्डीमय झाला आहे. जिल्ह्यातील विविध मंडळ कबड्डी चा कसुन सराव करत आहेत.

पैठण येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी पुरूष गटात परभणी जिल्ह्यातील राजे शिवाजी कोल्हा या संघाने तृतीय क्रमांक पटकावला तर गंगाखेडच्या महिला गटात आनंदवन क्रीडा मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकावला तसेच परभणी मानवत येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील पुरूष गटात साई क्रीडा मंडळ पाथरी च्या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला तर महिला गटात गंगाखेडच्या आनंदवन क्रीडा मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.

मानवत स्पोर्टस् अॅकडमीने मानवत शहरात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात घेऊन मानवत नगरी कबड्डीमय केली आहे. भविष्यात मराठवाड्यातुन ,खानदेशातुन, नंदुरबार जिल्ह्यातुन महाराष्ट्राला चांगल्या दर्जाचे खेळाडू मीळतील असा आशावाद व्यक्त होतोय.

स्पर्धेचा निकाल….
-पुरूष गट-
प्रथम- एन.टी.पी.एस. नंदुरबार
द्वितीय- सिंहगड पुणे
तृतीय-समता क्रीडा मंडळ अ.नगर
चतुर्थ- साई क्रीडा मंडळ पाथरी (परभणी जिल्हा)

-महिला गट –
प्रथम- शिवओम क्रीडा मंडळ पुणे
द्वितीय- जागृती प्रतिष्ठान पुणे
तृतीय- आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड(परभणी जिल्हा)
चतुर्थ- बारामती स्पोर्टस् अकॅडमीचे बारामती