बर्थडे बॉय अजय ठाकुरबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या १० गोष्टी

३. १४ वर्षांचा कबड्डीचा अनुभव असणार्या अजय ठाकूरने २००७ च्या आशियाई इंडोर गेम्समध्ये पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. २०१६ च्या कबड्डी विश्वचषकात अजय ठाकूरची महत्त्वाची भूमिका होती. चढाईत सर्वाधिक गुण नोंदवणारा खेळाडू तर होताच याशिवाय ६८ गुणांसकट सर्वाधिक गुण नोंदविणारा खेळाडूसुद्धा ठरला. तसेच या विश्वचषकात तो मालिकावीरदेखील ठरला.
५. अजय ठाकूर प्रो कबड्डीच्या सर्व हंगामात खेळला आहे, पहिल्या दोन हंगामात तो बेंगळूरु बुल्सकडून खेळला आहे आणि तिसर्या व चौथ्या मोसमात तो पुणेरी पलटणकडून खेळला आहे. पाचव्या हंगामात तमिळ थालाईवाज या संघाने अजय ठाकूरला आपल्या संघात घेतले.
६. अजय ठाकूरची फ्लाइंग जंप कबड्डीमध्ये प्रसिद्ध आहे.
७. तो हिमाचल प्रदेश पोलिस सेवा केडरचा सदस्य आहे जो सध्या पोलिस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे.
८. २०१४ मध्ये इंचेऑन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळालेल्या सुवर्णपदकामुळे त्याला हिमाचली ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
९. अजयला त्याच्या डू किंवा डाय रेडमधील कौशल्यासाठी ओळखले जाते.
१०. अजयला २०१९ साली सुरुवातीला पद्मश्री आणि नंतर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.