बर्थडे बॉय अबोझारबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

10 Things You Don't Know About Birthday Boy Abozar Mohajermighani

१. इराणमध्ये कबड्डीपेक्षा कुस्ती जास्त प्रसिद्ध असल्याने साहजिकच अबोझार हा एक कुस्तीपटू होता.

२. अबोझारच्या भावाने त्याला कबड्डीची गोडी लावली आणि कबड्डी खेळण्यास भाग पाडले.

३. अबोझारने कबड्डी खेळायला सुरुवात करेपर्यंत त्याच्या घरच्यांना या खेळाची माहिती नव्हती.

४. अबोझार एक कबड्डी खेळाडूबरोबरच कबड्डी प्रशिक्षकसुद्धा आहे. इराणमध्ये लहान मुलांच्या काही संघाना तो प्रशिक्षक नात्याने मार्गदर्शन करत असतो. पुढे जाऊन आपल्यासारखीच ही मुले चांगले कबड्डीपटू बनून प्रो कबड्डीमध्ये येतील असा त्याला विश्वास आहे.

५. अबोझारने इराणकडून २०१८ च्या आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. याबरोबरच २०१०, २०१४ च्या आशियाई स्पर्धांमध्येसुद्धा अबोझारने इराणकडून रौप्य पदक मिळवले. २०१४ च्याआशियाई बीच कबड्डी स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले.

६. तो कबड्डी विश्वचषक २०१६ मध्ये सुद्धा इराणच्या संघाचा भाग होता. ह्या स्पर्धेत इराणच्या संघाने रौप्य पदक जिंकले.

७. प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामात गुजरात फॉर्च्युन जायंट्सने अबोझारला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. त्या हंगामात तो गुजरातचा सर्वात यशस्वी बचावपटू ठरला. गुजरातकडून अबोझार आणि फझल या दोन इराणी खेळाडूंनी भल्याभल्या रेडर्सची झोप उडवली.

८. अबोझारची चांगली कामगिरी लक्षात घेऊन पुढच्या हंगामात तेलगू टायटन्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले.

९.जकार्ता येथे पार पडलेल्या २०१८ च्या आशियाई स्पर्धांमध्ये इराणने भारताचा उपांत्य फेरीत पराभव केला. इराणच्या या विजयात अबोझार आणि फझलचा मोठा वाटा होता. या दोघांनी संघाच्या एकूण गुणांपैकी जवळपास निम्मे गुण नोंदविले होते.

१०. अबोझारला स्मायलींग असॅसिन या टोपणनावाने ओळखले जाते.

११, ख्रिस्तियानो रोनाल्डो हा अबोझारचा आवडता खेळाडू आहे.